हे लेख सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत!
या लेखांच्यामध्ये काही तुटक्या ओळी आहेत, त्या कविता नाहीत. ते फक्त विचार आहेत. काही सरळ आहेत. स्पष्ट आहेत. काही अस्पष्ट आहेत. त्या तुटक्या ओळीत वाचकांनी स्वत:चे विचार, कृती आणि आवाज मिळवून त्या कविता पूर्ण करायच्या आहेत. अर्थात, ही अपेक्षा जरा जबरदस्तीची आहे, पण जाता जाता, आणि कदाचित परतणे शक्य होणार नाही म्हणून तीही करतो.......